
नितेश गट्टीवार गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलग्रस्त भागात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. जिल्ह्यातील जनतेशी समन्वय साधत विकासाभिमुख वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाने विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला.

यावेळी बोलताना डॉ. देवराव होळी यांनी निलोत्पल यांच्या कार्याचे कौतुक करत गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात त्यांनी जबाबदारीने काम केले असल्याचे सांगितले. कोल्हापूर येथेही ते आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नविन पोलीस अधीक्षक एस. रमेश, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी निलोत्पल यांना निरोप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

