
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१४ एप्रिल:
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांच्या गौरवशाली स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असता,या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण .करून पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत सामाजिक न्याय, समता, बंधुता व लोकशाही या मूलभूत मूल्यांवर आधारित बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले.यावेळी त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा गौरव करण्यात येऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना प्राप्त झालेल्या अधिकारांची जाणीव करून देण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, पोलीस निरीक्षक गडचिरोली विनोद चव्हाण साहेब,भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजीत कोवासे, आदिवासी काँग्रेस राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम,नगरसेवक सतीश विधाते,नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,जिल्हा उपाध्यक्ष शंकररावं सालोटकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर वासेकर,समशेरखा पठाण, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, काशिनाथ भडके, नेताजी गावतुरे, उत्तम ठाकरे, मोहन वर्गंटीवार, अब्दुल पंजवानी, माधव गावड, हेमंत मोहितकर, जितेंद्र मुनघाटे, शुभम गजबे, सुदर्शन उंदीरवाडे, लालाजी सातपुते, पांडुरंग घोटेकर, निकेश कमीडवार, स्वप्निल बेहेरे, प्रचित चौधरी, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, जावेद खान, कल्पनाताई नंदेश्वर, कविताताई उराडे, मिनलताई चिमूरकर, रीताताई गोवर्धन, शालिनीताई पेंदाम सह उपस्थित होते.
चामोर्शी: येथे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, शेषराव कोहळे, संजय खेडेकर, वासुदेव चिजघरे, विष्णू ढाली, भुवनेश्वर चुधरी, कविता किरमे,रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार ,यश गण्यारपवारआदि सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरमोरी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावंगी येथे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार श्री रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पदाधिकारी व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

