
साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी चामोर्शीतील समाजबांधव नागपूरकडे रवाना

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी : धोबी समाजाच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा आणि समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला बळकटी मिळावी, या उद्देशाने नागपूर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होण्यासाठी चामोर्शी येथील समाजबांधवांनी आज शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी नागपूरकडे प्रस्थान केले.

धोबी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे साखळी उपोषण सुरू असून, या आंदोलनाला राज्यभरातून समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर चामोर्शी येथील समाजबांधवांनी एकजूट दाखवत नागपूरच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकजुटीने लढा देण्याचा संदेश या प्रस्थानातून देण्यात आला.
यावेळी नितेश गट्टीवार, अनिल मोते, बबनराव श्रीकुंटवार, दिवाकरजी ताजणे, सुधीर गडपायले, राजेश मानपल्लीवार, सुधाकरजी लोणारे, प्रमोद वाकुडकर, शांताराम मानपल्लीवार, रुपेश कोतकोंडावार आदी समाजबांधव नागपूरकडे रवाना झाले.
समाजाच्या एकजुटीचा नारा बुलंद करत चामोर्शीतील समाजबांधवांनी नागपूरच्या साखळी उपोषणाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.

