
दीन-दलितांच्या कैवाऱ्याला विनम्र अभिवादन!
गडचिरोली: स्थानिक गांधी वार्डातील आदिवासी परधान समाज मंदिर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वार्डातील नागरिकांनी एकत्रित येऊन महामानवाच्या स्मृतीस अभिवादन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते, अमोल मेश्राम, रेवनाथ गोवर्धन व चिमुरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

उपस्थिती:
यावेळी महेंद्र मसराम, विवेक वाकडे, अजय सुरपाम, सतीशदादा कुसराम, रुपेश सलामे, राजेश डोंगरे, कुणाल कोवे, आकाश कुळमेथे, बादल मडावी, विजय सुरपाम, राज डोंगरे, अंकुश बारसागडे, अवि शेंडे, अनिकेत बांबोळे, नंदू कुंभारे गणेश मेश्राम, मोहित सूर्यवंशी, नितीन सिडाम, विक्रम केळापूरे, विकल्प मसराम, नेहाल मेश्राम, वैभव रामटेके, साहिल गोवर्धन, प्रभू भोंगळे, भावेश खोब्रागडे, महादेव कांबळे, हिमांशु वाकडे, तुषार गोवर्धन, मनोज मेश्राम यांच्यासह गांधी वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

