
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
कोरची ईथुन 17 किमी अन्तरावरील हुडूकदुमा येथील रमुला महेश काटेन्गे 24 ही गरोधर माता, बाळासह योग्य उपचाराअभावी मरण पावली.
कोरची तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे या माता मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मृत्तकाचे पती महेश आसाराम काटेन्गे यांच्या सांगण्यावरून काल रात्री पत्नी रमूला हिला वेदना आल्या.लगेच तेथील आशा वर्करला बोलाविले. परंतु ती आली नाही. आणि कोणत्याही प्रकारची उपचार केले नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले नाही. NEWSJAGAR

रमुलाला वेदना वाढत चालल्या त्यामुळे सकाळी 102 क्रमांकाची गाडी बोलवून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय कोरची येथे डॉक्टर उके आणि डॉक्टर ईटणकर यांनी औषधोपचार केले. रमुलातला बाळंत पण केला, नवजात मुलगी जन्माला आली परंतु ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आई आणि बाळाला आम्ही वाचू शकलो नाही असे डॉक्टर म्हणाले.
कोरची तालुक्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच असतो यापूर्वी सुद्धा माता बाळ औषधोपचाराच्या कमतरतेमुळे मरण पावलेले आहेत. गावात 24 तास आशा वर्कर असते, मानसेवी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे,बोटेकसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून तिथे डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका वैद्यकिय अधिकारी आहेत. तालुक्यात 18 ते 20 डॉक्टर आहेत. तीन वैद्यकीय अधिकारी आहेत.असे असताना लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकत नाही.शेवटी लोक कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन येतात. या ठिकाणी सुद्धा अपुरी व्यवस्था असल्यामुळे योग्य औषधोपचार मिळत नाही.माता बाल मृत्यू वाढलेले आहे.

