
- आमदार देवराव भोंगळेयांच्या प्रयत्नांना यश – ५ कोटींचा निधी मंजूर
राजुरा: राजुरा नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीच्या कामांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज संबंधित ठिकाणांची पाहणी करून कामांच्या आराखड्याचा आढावा घेतला.
या पाहणीवेळी आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना प्रत्यक्षात यश मिळाल्याचे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. आमदार भोंगळे यांनी मागील काही महिन्यांपासून राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन व संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून,राजुरा शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगर परिषदचे पदाधिकारी तसेच भाजपाचे कार्यकर्ते या पाहणीवेळी उपस्थित होते. शहरातील रस्ते काँक्रीट व डांबरीकरण करणे, बंदिस्त नाली बांधकाम, सार्वजनिक वाचनालय बांधकाम, समाजगृह बांधकाम, सार्वजनिक ठिकाणांची सुशोभीकरणे अशी विविध कामे या निधीतून करण्यात येणार आहे .
निधीच्या मंजुरीबद्दल बोलताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले, राजुरा शहराचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणूनच हा निधी मंजूर करून घेतला आहे. लवकरच या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. राजुरा शहरातील नागरिकांमध्ये या विकासकामांविषयी उत्साहाचे वातावरण असून,अनेकांनी आमदार भोंगळे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
राजुरा शहरातील विविध विकासकामे करण्यासाठी निधी मंजूर झालेल्या सबंधित जागेची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विजय डाळ, शाखा अभियंता वंदना कोवे, हेमंत मानापुरे,अश्विनी पाटील,जयश्री कातकडे, भाजपा राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री मिलिंद देशकर ,भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष नितीन सिडाम, युमोर्चा चे महामंत्री स्वप्निल पहानपटे, महेंद्र बुरडकर, नितीन वासाडे, प्रदीप मोरे,गणेश रेकलवार , रवी लेकलवार, राकेश आदे, तुषार कोरटे, कृष्णा मेकलवार, यांचेसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


