
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान सन 2023-2024 अंतर्गत मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतानुसार एकूण गरजवंत 74 मुलींना मोफत सायकल वितरण करण्यात आले. बेडगांव केंद्रा अंतर्गत वर्ग 08 ते 12 पर्यंत शिक्षणाची सोय असणारी एकमेव शाळा आहे. या शाळेत काही विद्यार्थी 06 किमी पासून येजा करतात. अश्या मुलींना येजा करण्यासाठी सोय व्हावी म्हणून जिल्हा खनिज प्रतिष्ठान कडून सायकल वितरणाचा लाभ देण्यात आला. प्रसंगी प्राचार्य सी. आर .धारणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती रीना सलामे, माजी अध्यक्ष प्रतिभा प्रधान, उपाध्यक्ष दिनेश तांडेकर,सरपंच चेतन किरसाण, पोलीस पाटील माधुरी गद्देवार, अंकालू बघावा, किशोर मानकर, बापूजी उईके, ज्येष्ठ शिक्षक एस.बी.उसेडी, प्रा. गणेश सोनकलंगी , प्रा. प्रमोद रामटेके,. श्रीकृष्णा उईके,प्रा. काजल मडावी, राकेश गायकवाड,विद्या उबरकर, नेहा निमजे ,प्रणय लंजे,श्रीमती जिजा खुणे, शिला नैताम यांच्या उपस्थितीत सायकल चे वितरण करून सायकल चा योग्य सदुपयोग करण्यास मार्गदर्शन करण्यात आले.

