
गडचिरोली — आदिवासी एकता युवा समिती तर्फे क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहिद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी भूषविले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून उमेश उईके व वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बाळू टेभुर्णे, डॉ. कीर्तिकुमार उईके यांनी उपस्थित राहून वीर बाबुराव शेडमाके यांच्या कार्य, बलिदान व आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली.
यावेळी वक्त्यांनी आदिवासी समाजातील युवकांनी शेडमाके यांच्या प्रेरणेतून संघटित होऊन समाजाच्या हक्क व अस्तित्व रक्षणासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन समितीचे सचिव प्रदीप कुळसंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समितीचे कोषाध्यक्ष मंगेश नैताम यांनी केले. कार्यक्रमास आदिवासी एकता युवा समितीचे सल्लागार प्रियदर्शन मडावी, समितीचे संघटक संजय मेश्राम, संघटक माणिक गेडाम, सहसचिव गिरीश उईके, प्रफुल्ल कोडाप, आकाश कोडाप, रमेश चिकराम, प्रवीण कोवे, खुमेंद्र मसराम, प्रदीप वडेट्टीवर, भार्गव कोडाप सह समाजातील युवा वर्गासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

