
◾प्रिया झांबरेंनी केली तक्रार!
◾विभागीय चौकशी प्रकरणात सादरकर्ता ना.त.फुलझेले यांनी केला तत्कालीन पटवा-याला वाचविण्याचा प्रयत्न – झांबरे यांचा आरोप!
चंद्रपूर◾ विशेष प्रतिनिधी ◾
नागपूर विभागा अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर येथे सध्या कार्यरत असलेले नायब तहसिलदार महेन्द्र फुलझेले यांनी नियमाला डावलून काम केल्याबद्दल व तत्कालीन बल्हारपूरचे तलाठी रोहित सिंग चव्हाण यांना विभागीय चौकशी प्रकरणात वाचविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल महिला व बाल सुरक्षा फाउंडेशनच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी थेट महामहीम राज्यपाल यांच्या कडे दि.1-8-25ला तक्रार केली.
या तक्रारीच्या प्रति त्यांनी विधानसभा अध्यक्ष, महसूल मंत्री,व महसूल आयुक्त नागपूर यांना देखील पाठविल्या आहेत.





एका प्रकरणाच्या अनुषंगाने बल्लारपूर येथील तत्कालीन तलाठी रोहितसिंग चव्हाण यांच्यावर प्रशासनाच्या वतीने विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती.त्यात सादरकर्ते म्हणून नायब तहसिलदार महेन्द्र फुलझेले यांची नियुक्ती करण्यात आली होती.परंतु यांनी चौकशा अधिका-याकडे आवश्यक व योग्य पुरावे असतांना देखील ते पुरावे सादर न केल्याचे प्रिया झांबरे यांनी संबंधितांना पाठवण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे.
यात नायब तहसिलदार यांनी संबंधित पटवा-याकडुन मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचा आरोप देखील त्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
दरम्यान या प्रकरणाचा संदर्भाने नायब तहसिलदार फुलझेले यांच्याशी दोनदा भ्रमणध्वनीवरून या प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होवू शकला नाही.
नागपूरच्या महसूल आयुक्तांनी या प्रकरणात चौकशी अहवाल मागितला असल्याचे समजते.


