
कॅन्सरग्रस्त माया मेश्राम यांना उपचारासाठी आर्थिक मदत
न्युज जागर : योगेश रामटेके ता. प्र.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून
आर्थिक मदत; महिला काँग्रेस अध्यक्षा उषाताई भोयर यांचा पुढाकार:
सावली : तालुक्यातील मौजा. पाथरी येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील कॅन्सरग्रस्त महिला माया कालिदास मेश्राम यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या माया मेश्राम यांच्यावर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे संकट ओढवल्याने कुटुंबासमोर उपचाराचा मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता.
माया मेश्राम यांची प्रकृती वारंवार खराब होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पुढील उपचाराचा खर्च करणे त्यांच्या कुटुंबासाठी मोठे आव्हान बनले होते.
दरम्यान, सदर परिस्थितीची माहिती मिळताच सावली तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. उषाताई भोयर यांनी राज्याचे विधिमंडळ गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मान. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून माया मेश्राम यांच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या माध्यमातून माया मेश्राम यांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली.

या मदतीमुळे माया मेश्राम यांच्या पुढील उपचारासाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला असून, कठीण प्रसंगी मदतीचा हात मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.यावेळी श्री. राजूभाऊ सिद्धम, माजी तालुकाध्यक्ष तथा सरपंच पाथरी, सौ. उषाताई भोयर, महिला काँग्रेस अध्यक्षा, ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहित मेश्राम, लताताई वडलकोंडावार, महिला ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्षा

