
“पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन” – खासदार डॉ. नामदेव किरसान
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.१९ जूलै : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ५,००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले, “पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. अभ्यासाला कधीही कंटाळू नका. आज मिळवलेले ज्ञानच भविष्यात तुमच्या यशाचा पाया ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.”
कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पा. नाट, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, माधव गावड, अजय लोंढे, परसराम टिकले, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेवक नंदू कायरकर, सुनील चटगुलवार, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, मनोज अग्रवाल, प्रमोद भगत, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, हरबाजी मोरे, नीतीन राऊत, दिलीप घोडाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.
याच कार्यक्रमात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत २५ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमाला मोलाचे योगदान दिले.

