
मुल गांधी चौक येथे युवक काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण आंदोलन
मुल, प्रतिनिधी (चेतन कामडे)
दिल्ली येथे सोनम वांगचुंग आणि अभिजीत दिपके यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच देशातील परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे सोमवार, दि. २० जुलै रोजी मुल येथील गांधी चौकात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आंदोलनात मुल तालुक्यातील युवक, परीक्षार्थी विद्यार्थी, शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणे, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना विरोध करणे आणि सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविणे हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
या आंदोलनात तालुक्यातील युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन युवक काँग्रेस तालुका ग्रामीण व शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, न्यूज जागर..

