
-आमदार रामदास मसराम यांचा पुढाकार
वडसा – जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे, बोनस, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पिक विमा कंपन्याकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी पंपा ऐवजी सोलर पंपामुळे तसेच स्मार्ट मीटरमुळे उद्भवलेल्या समस्या, पीक नुकसानीची अद्यापही न मिळालेली भरपाई इ. विविध शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वा खाली घंटानाद आंदोलन दि. 25 आगस्ट ला सकाळी 10 वाजता देसाईगंज उपविभागीय कार्यालया समोर करण्यात येत आहे.
तरी शेतकरी बांधवांसह परिसरातील जनतेनी या आंदोलनात सहभागी व्हावे. असेल आव्हान आरमोरी, देसाईगंज, कोरची, कुरखेडा तालुका काँग्रेस कमेटीने केले आहे.

