
रुग्णांसाठी डॉक्टरच नव्हे, तर विश्वासाचा आधार ठरलेले व्यक्तिमत्त्व

प्रलय सहारे
प्रतिनिधी| भेंडाळा: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळणे ही मोठी गरज असते. ही गरज ओळखून गेल्या सात वर्षांपासून भेंडाळा येथील नागरिकांना सातत्याने आरोग्यसेवा देणारे डॉ. अमित कृष्णदासजी आभारे यांनी आपल्या सेवाभावी कार्यातून परिसरात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.

रुग्णांची आस्थेने विचारपूस करणे, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेणे आणि योग्य मार्गदर्शन करण्याला डॉ. आभारे नेहमीच प्राधान्य देतात. त्यामुळे भेंडाळा आणि परिसरातील नागरिकांमध्ये ‘आपले डॉक्टर’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
आरोग्यसेवेचा हा प्रवास भेंडाळ्यापुरता मर्यादित नाही. भेंडाळा येथे सेवा देण्यापूर्वी त्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर, पोटदुखी, कार्डिओलॉजी व नेफ्रोलॉजी क्षेत्रातील आरोग्यसेवा तसेच मेहरा हॉस्पिटल आणि सोयतकर हॉस्पिटल, चंद्रपूर येथेही कामाचा अनुभव घेतला आहे. या अनुभवाचा उपयोग ग्रामीण भागातील रुग्णांना मार्गदर्शन करताना होत आहे.
आरोग्याबाबत जनजागृती, योग्य वेळी उपचार घेण्याचे महत्त्व आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील असतात. वैद्यकीय ज्ञानासोबतच रुग्णांशी आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची पद्धत त्यांच्या कार्याची विशेष ओळख बनली आहे.
सात वर्षांच्या या आरोग्यसेवेच्या प्रवासात अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर आलेले समाधान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील विश्वास हीच डॉ. अमित आभारे यांच्या कार्याची खरी पावती म्हणावी लागेल.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेंडाळा परिसरातील नागरिक, रुग्ण आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या हातून आरोग्यसेवेचे हे कार्य भविष्यातही अधिक व्यापक व्हावे, समाजातील गरजू नागरिकांना उत्तम सेवा मिळावी आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!

