
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कुरखेडा, दि. २१ जून :
नगर पंचायत कुरखेडा येथील प्रभाग क्रमांक १६ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा रवि उईके यांनी विजय मिळविला. त्यांच्या विजयाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत सहभागी होत आमदार रामदास मसराम यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी जनतेने काँग्रेसवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच विकासकामांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षांनुसार काम करण्याचे आवाहन केले.
प्रतिभा रवि उईके यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

