
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली, २१ जून : गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ (अ) मधील नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अंकुश उर्फ गोलू नैताम यांनी विजय मिळवला. २० जून रोजी मतदान झाल्यानंतर २१ जून रोजी मतमोजणी पार पडली.
मतमोजणीत अंकुश उर्फ गोलू नैताम यांना १,३७१ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांना १,१०७ मते मिळाली. त्यामुळे नैताम यांनी २६४ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

या पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. विजय मिळाल्यानंतर अंकुश उर्फ गोलू नैताम यांनी या यशाचे श्रेय माजी खासदार डॉ. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, ॲड. प्रमोद पिपरे, ज्येष्ठ नेते रमेश भूरसे, नगरसेवक सागर निंबोरकर, घनश्याम वाढई, आकाश बोलुवार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
नवनिर्वाचित नगरसेवक अंकुश उर्फ गोलू नैताम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रभागातील नागरिक, महिला आणि युवकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला.

