
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
गडचिरोली, दि. १७ जून :
गडचिरोली नगरपरिषदेच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मध्ये भाजप-महायुतीच्या प्रचाराला वेग आला असून, भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार अंकुश उर्फ गोलुभाऊ दिलीप नैताम यांच्या प्रचारार्थ माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी झंझावाती प्रचार दौरा करून मतदारांशी थेट संवाद साधला.

तेली मोहल्ला हनुमान मंदिर परिसर तसेच ढिवर मोहल्ला येथे डॉ. अशोकजी नेते यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी, विशेषतः महिला मतदारांनी उमेदवार गोलुभाऊ नैताम आणि महायुतीच्या प्रचार उत्स्फूर्तपणे केला.
यावेळी मतदारांशी बोलताना मा.खा.डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी भाजप-महायुतीचे उमेदवार गोलुभाऊ नैताम यांना आपल्या अमूल्य मतांचा कौल देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे.”
या प्रचार दौऱ्यात माजी आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतज वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, नगरपरिषद बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर, महिला बाल कल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेवक सागर निंबोरकर, नगरसेविका वर्षा शेडमाके, कोमल नैताम, ज्ञानेश्वरी धंदरे, गुड्डी मारबते, ज्येष्ठ नेते गजानन येनगंदलवार, सुधाकर येनगंदलवार, सुधाकर पेटकर,सुरेश भांडेकर तसेच अविनाश विश्रोजवार आणि सलीम शेख यांच्यासह भाजप-महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मध्ये भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, उत्साही वातावरणात कार्यकर्त्यांनी उमेदवार गोलुभाऊ नैताम यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. आगामी मतदानात विकासाच्या मुद्यावर मतदार भाजप-महायुतीला कौल देतील, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

