
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली
आरमोरी,दि.१७ जून:
महावितरणकडून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात तसेच घरगुती वीजदरांमध्ये झालेल्या चार पटीने वाढीच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेवर स्मार्ट मीटर योजना सक्तीने लादण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी दिला आहे.
स्मार्ट मीटर प्रणालीमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये संभ्रम, भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रीपेड पद्धतीवर आधारित या योजनेमुळे शेतकरी, शेतमजूर, लहान व्यावसायिक, हातावर पोट असलेले कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. वीज वापराच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने समोर येत आहेत.

ज्या घरगुती ग्राहकांना आजवर पाचशे ते सातशे रुपये बिल येत होते परंतु आता मात्र 100 युनिटपर्यंत वीज वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क 4 रुपये आणि 101 युनिटनंतर आकारण्यात येणाऱ्या 15 रुपये युनिट या मोठ्या फरकामुळे घरगुती ग्राहकांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात वाढुण 300 हजार पासून सुरूवात ते 11हजाराच्या वरुण बिले लादल्याने चार पट वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत असून अनेक कुटुंबांना वाढीव वीजबिलाचा फटका बसला आहे
याशिवाय स्मार्ट मीटर प्रणालीत रिचार्जची रक्कम संपल्यास वीजपुरवठा तात्काळ खंडित होत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागात नेटवर्क समस्या, तांत्रिक बिघाड, चुकीचे रीडिंग, ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेबाबतचे प्रश्न तसेच रिचार्ज प्रक्रियेतील अडचणी यामुळे नागरिकांचा या प्रणालीवरील विश्वास कमी होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत.
वीज ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. गरीब, शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर अन्याय करणारे कोणतेही धोरण आपण सहन करणार नाही. स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेवर होणारी बिलांच्या रुपात चार पट अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण रस्त्यावर उतरून जनतेच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या निर्णयांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून गावोगावी नागरिकांशी संवाद साधून स्मार्ट मीटरच्या परिणामांची माहिती दिली जाईल.
शासनाने जनभावनांचा आदर करून स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, तसेच घरगुती लावलेले स्मार्ट मिटर चे चार पटीने वाढलेले बिले कमी करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल. असा इशारा आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी दिला आहे.

