
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली,दि.१६ जून:
गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 09 (अ) येथील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विनोद रामकृष्ण भांडेकर यांच्या दोन प्रचार कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विनोद रामकृष्ण भांडेकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन नागरिकांना केले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर,नंदू कायरकर, रमेश चौधरी, नदीम नाथानी, विपुल एलटीवार, गौरव एनप्रेड्डीवार, जावेद खान, रुपेश टिकले, स्वप्निल बेहरे, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर,हरबा मोरे, नगरसेविका मनीषा खेवले, रीताताई गोवर्धन, शितल ठवरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

