
✍️नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर गडचिरोली
आरमोरी,दि. १५ जून : आरमोरी येथे आ.रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत कांग्रेस कार्यकर्ता बैठक घेऊन संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष संघटना बळकट करणे, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात आला.
त्यानंतर कार्यकर्ते व नागरिकांशी जनसंवाद साधून त्यांच्या विविध समस्या, अडचणी व विकासकामांसंदर्भातील मागण्या जाणून घेण्यात आल्या. जनतेच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, धनपाल मिसार सर, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, नगरसेवक अक्षय बागडे, बगुजी ताडाम, मनोज सपाटे, खेमराज प्रधान, राजू सामृतवार, मुखरु पाटील देशमुख, अनिल किरमे, अजय रामटेके, बंडू खोडवे, रवी डोकरे, माजी पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये, तुकाराम वैरकार, मेघराज बूराड, संगीता पेंदाम, विद्या सपाटे, अर्चना मडावी तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

