
नितेश गट्टीवार
गडचिरोली दि.१६ एप्रिल:
संघटन सृजन अभियानाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा आमदार मनीष यादव , तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक म्हणून माजी मंत्री सुनिल देशमुख, आमदार संजय मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, विविध सेल व फ्रंटल संघटनांचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निरीक्षक म्हणून उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनात्मक बळकटीकरणावर भर दिला. या संवादाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया पारदर्शक व संघटन मजबूत करणारी पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि आगामी राजकीय रणनीती यावरही सखोल चर्चा करण्यात आली.

