
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
जिल्हाधिकार्यान्च्या निर्देशानुसार कृषी विभागाने रब्बी हन्गामात मका लागवड करण्यासाठी केलेल्या जनजागृतीला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.यन्दा कोरची तालुक्यात रब्बी हन्गामातील एकुण क्षेत्राच्या 50% क्षेत्रात मका लागवड झाली आहे.ही लक्षणीय वाढ शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार केलेल्या बदलाचे स्पष्ट उदाहरण आहे.
कोरची येथील शेतकरी शालीकराम कराडे यांनी सांगितले, धान पिकाला भरपूर पाणी आणि वीजेची गरज असते. पण सध्या पाणी आणि वीजेचा पुरवठा दिवसेंदिवस घटत चालला आहे.त्यामुळे आम्ही यावर्षी मका लागवड केली आहे.धानाच्या तुलनेत मकाला पाणी कमी लागते व उत्पादन वाढते.कृषी विभागाच्या जनजागृती मुळे हे पीक घेण्याचे ठरविले.

तालुक्यातील एकुण रब्बी पिकाच्या 50% क्षेत्रात मका लागवड झाल्याने मकाचे उत्पादन वाढणार आहे.मात्र खरेदीची व्यवस्था न झाल्यास शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना द्यावे लागेल.त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल.
शेतकरी शालीकराम कराडेसह अनेक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की,जिल्हाधिकारी यांनी महामंडळाला मका हमी भावाने खरेदी करण्यास आदेश द्यावे.
कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केले की महामंडळाने हमीभावात मका खरेदी करावा.
धान सोडा, मका घ्या. पाणी वाचवा, उत्पन्न वाढवा.हा सन्देश सध्या कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये फीरत आहे.आता प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कसे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जिल्हाधिकारी पांडा यांनी कोरची तालुक्याच्या ठिकाणी येऊन तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली त्यात मक्का लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याचे जाणून घेतले तेव्हा आदिवासी महामंडळ व कृषी विभागाला मका खरेदी केंद्राचे तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण अजूनही आदिवासी विकास महामंडळ व कृषी विभागाकडून कसल्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
आधारभुत किमतीमध्ये मका विक्री करण्याची आनलाईन नोंदणी करण्याची शासनाने 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली असताना तालुक्यात अजूनही मका खरेदीसाठी सेंटर घोषित झाले नाही. त्यामुळे आनलाईन प्रक्रिया करण्यास शेतकऱ्यांना अडचन निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तालुक्यात मका खरेदी केन्द्र घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
मक्का खरेदी सेंटर करीता शासकीय गोदामाची आवश्यकता असते त्यामुळे संबंधित तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे गोदामाची मागणी केली आहे गोदामात उपलब्ध झाले की कोरची उपप्रादेशिक आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत कोरची येथील खरेदी सेंटर व मालेवाडा खरेदी केंद्रात मक्का खरेदी सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे त्याबद्दल शेतकर्यांना माहिती दिली जाईल ——गणेश सांबडे उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ कोरची

