
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.११ एप्रिल:
जिल्हा काँग्रेस कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, काशिनाथ भडके, जिल्हाध्यक्ष सहकार विभाग अब्दुलभाई पंजवानी, परिवहन विभाग रुपेश टिकले, हरबाजी मोरे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कल्पनाताई नंदेश्वर, कविता उराडे, उत्तम ठाकरे, निकेश कामिडवार, गौरव येणप्रेड्डीवार सह इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याची गरज व्यक्त केली.

