
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१२ एप्रिल:
जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी, स्थानिक प्रश्न व जनतेच्या समस्या मांडल्या. खासदार डॉ. किरसान यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित समस्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठान, नगरसेवक तथा शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वाटगंटीवार, देवाजी सोनटक्के, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, जिल्हाध्यक्ष किसान विभाग गडचिरोली वामनराव सावसाकडे, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, मुस्ताक हकीम, नदीम नाथानी, दिवाकर निसार, निजान पेंदाम, प्रतिक बारसिंगे, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, ढीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, समीर ताजने, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, लालाजी सातपुते, संदीप भैसारे, नितीन लाडे, स्वप्नील बेहरे, विजय राऊत, जावेद खान आदी मान्यवर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास खासदार डॉ. किरसान यांनी व्यक्त केला.

