
नितेश गट्टीवार, गडचिरोली दि.८ एप्रिल:
सार्वजनिक शिव – भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रबोधनात्मक सार्वजनिक संयुक्त जयंती महोत्सव बाजार चौक चामोर्शी येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रियदर्शी सम्राट अशोक, राष्ट्रपिता जोतीबा फुले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार , उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा जयश्री वायलालवार , विशेष अतिथी म्हणून चामोर्शी पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक दीपक डोंब व अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हाटकर उपस्थित राहणार आहेत.

संयुक्त जयंती महोत्सवाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे चामोर्शी नगर पंचायतसह ५५ इतक्या सामाजिक व जातीय संघटनांच्या वतीने मागील ११ वर्षापासुन हा संयुक्त जयंती महोत्सव विविध नामवंत वक्ते व किर्तनकार यांचे प्रबोधन कार्यक्रम आयोजित करून नगरात सामाजिक सलोखा राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले जात आहे.
या महोत्सवाला चामोर्शी नगरातील व परिसरातील सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिव -भिम जयंती उत्सव समिती चामोर्शीच्या वतीने करण्यात आले आहे .

