
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.८ एप्रिल :
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, गडचिरोली यांच्या वतीने नवनियुक्त आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. माधवराव गावळ यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. इंदिरा गांधी चौक येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावळ यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा महासचिव उमेश उईके, महिला जिल्हा सचिव विद्या दुग्गा, जिल्हा संघटक पवन गेडाम, जिल्हा सचिव सुरज मडावी, जिल्हा महिला सहसचिव तनुजा कुमरे, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, निकिता कुमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.

