
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची येथील तालुका प्रतिनिधी लालचंद जनबंधू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांची पत्नी पत्रकला जनबंधू (५३) यांचे रविवारी रात्री कर्करोगामुळे निधन झाले. Patrakala Janbandhu
पत्रकला या गेल्या दहा महिन्यांपासून नागपूर येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे वैद्यकीय प्रशासक डॉ. आनंद पाठक dr. anand pathak यांच्या देखरेखीखाली, पोटातील ‘अँट्रम’ आणि ‘पायलोरस’ या भागांमधील कर्करोगाशी लढा देत होत्या. त्यांच्या पोटातील ५.७ सेमी लांबीच्या गाठीमध्ये ‘कार्सिनोमा सिग्नेट रिंग’ (Carcinoma signet ring) या प्रकारचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. सुरुवातीला त्यांच्यावर अठरा वेळा केमोथेरपी, तीन वेळा इम्युनोथेरपी आणि दोन वेळा ‘फॉल्फॉक्स’ (Folfox) उपचार करण्यात आले; परंतु दुर्दैवाने, ‘फॉल्फॉक्स’ उपचारांचा ताण त्या सहन करू शकल्या नाहीत आणि रविवारी रात्री स्वतःच्याच निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. NCI

आतड्यांमधून अन्न पुढे जावे यासाठी नागपूर येथील डॉ. अमित अग्रवाल यांनी त्यांच्या शरीरात ‘स्टेन्ट’ही बसवला होता; मात्र सलग तीन महिने उलट्या होत राहिल्यामुळे त्यांना तीव्र रक्तक्षय (ॲनिमिया) झाला. तसेच, स्नायूंची ताकद क्षीण होणे, दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होणे यांसारखे त्रास सुरू झाले. मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांना उभे राहणे, चालणे, बसणे, तसेच खाणे-पिणेही अशक्य झाले होते. त्यांच्या पश्चात नितेश (२९) आणि अंकेश (२६) हे दोन मुलगे आहेत. त्यांच्यावर कोरची येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

