
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.६ एप्रिल:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक चामोर्शी येथे उत्साहात पार पडली. या बैठकीला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस गडचिरोली सिनेट सदस्य तथा जिल्हा युवती अध्यक्ष तनुश्रीताई आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा युवक अध्यक्ष तथा नगरपरिषद गडचिरोलीचे सभापती लिलाधर भरडकर, आरमोरी विधानसभा निरीक्षक रिंकू पापडकर, प्रदेश संघटक सचिव लौकीक भिवापूरे, चामोर्शी तालुका अध्यक्ष तथा नगरपंचायत सभापती निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच पूर्णचंद्रराव सिडाम महाराज, माजी जि.प. अध्यक्ष समय्या पसुला, डिम्पल उंदिरवाडे, शिवराज भिवापूरे, कबीर आभारे, डॉ. सूरज आगडे, व्यंकटेश बुर्ले, डॉ. भाकरे, सरपंच रुपाली दुधबावरे, कोहळे मॅडम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुका, पक्ष संघटन बळकटीकरण, बूथ स्तरावरील नियोजन आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत विक्रमपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

