
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून डोंगरा पहाडाने वेढलेला आहे मी या तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले असून अजून पर्यंत ह्या तालुक्याचा विकास झाला नाही. ह्या तालुक्यातील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातात द्या मी या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी व अतिक्रमणाची पट्टे मिळवून देण्या सोबतच या तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न करत राहील असे प्रतिपादन माननीय आमदार डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी आढावा बैठकीत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरची च्या वतीने येथील गोटूल भवनामध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी, जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ नरोटे ,जेष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे ,माजी जि प अध्यक्ष रवींद्र ओलालवार, विधानसभा अध्यक्ष किशोरजी तलमले ,सुनील नंदनवार, रिंकू पापडकर नगरपरिषद सभापती लीलाधर भरडकर, कुमारी तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना धर्मराव बाबा म्हणाले या तालुक्यातील आदिवासींवर काँग्रेस व भाजपाकडून नेहमीच अन्याय करण्यात आलेला असून या क्षेत्रातील नेत्यांची दोरी वारांच्या हातात आहे परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा नेता म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करणार असल्याचेही ते पुढे म्हणाले कोरची तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या सीटा राष्ट्रवादीच्या ताब्यात दिल्यास येथील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा व अतिक्रमण जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रामाणिक प्रामाणिक प्रयत्न करीन असेही ते पुढे म्हणाले आढावा बैठकीचे संचालन राजू सहारे यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अनिल केरामी यांनी केले कार्यक्रमाला कोटरा बिहिटेकला व कोरची कोटगुल जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आविस व ग्रामसभांचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात अनिल केरामी यांनी रस्ते, विघुत, शिक्षण,आरोग्य, पाणी, पुलाची समस्या, घरकुल, आदि समस्या अजुनही सुटल्या नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटीॅच्या झेंडा फडकविणार असे प्रतिपादन अनिल केरामी यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.

