
बोरमाळा येथे गाव तलावात बुडून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू
▶ योगेश रामटेके : (विशेष प्रतिनिधी ) 
सावली : सावली तालुक्यातील बोरमाळा येथे आज संध्याकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील गाव तलावामध्ये बुडून एका नऊ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धृप दिवाकर कारमेंगे (वय ९ वर्षे) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज संध्याकाळी ५:०० वाजताच्या सुमारास पाथरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. धूप हा तलावाच्या परिसरात गेला असताना अचानक पाण्यात बुडाला. घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला
नाही. या घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. नऊ वर्षीय धृपच्या अशा अचानक जाण्याने बोरमाळा गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

