
नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी)दि.५ एप्रिल:
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दीन, कर्मवीर श्री मा. सा. कन्नमवार यांची जयंती व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्याने चामोर्शी येथील नगर पंचायत भवन येथे ०३ एप्रिल रोजी पंकज पेशट्टीवार मित्रपरिवार , बेलदार समाज, शिवभक्त, शिवसेना मदत कक्ष व बजरंग दलाच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षिका रत्नप्रभा जुवारे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, पाहुणे म्हणून बेबीबाई सदूलवार ,साईनाथ पेशट्टीवार ,विजय पेद्दीवार दत्तूजी बर्लावर आदी उपस्थित होते. या शिबिरात सुधीर गोपावार, आकाश नेवारे, बीक्की करणकर, भूषण ऐलावार ,पियुष पेशट्टीवार ,सागर सदुलवार यांच्यासह ५० युवकांनी सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली तर रक्तदान संकलन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संकलन पथक उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी प्राण सरकार, सतीश सोमणकर, पोषक गेडाम, सुधीर भांडेकर, यशवंत कत्रोजवार चंद्रभुषन वालदे ,शिवसेनेचे सुरज नैताम ,संतोष कटारे, निलेश रेड्डीवार दीपक सदुलवार, सुजय शहा, आशिष कार्लेवार ,आकाश घागरतवार ,स्वयम पील्लीवार ,सृष्टी पेशट्टीवार ,प्रवीण नैताम, आशिष संगमवार ,उमा गंधमवार ,माधवी पेशट्टीवार ,रूनल गांडलेवार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. आभार पंकज पेशट्टीवार यांनी मानले.

