
नितेश गट्टीवार ,गडचिरोली/धानोरा दि.४ एप्रिल:
धानोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित ‘तालुका स्तरीय आढावा बैठक’ आज किसान भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यमान आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होते.आज दि.४ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी या आढावा बैठकीचे आयोजन ‘किसान भवन, धानोरा’ येथे करण्यात आले होते.

या प्रसंगी डॉ. आत्राम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जनसंपर्क वाढवण्याचे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.या बैठकीत तनुश्री धर्मरावबाबा आत्राम जिल्हा युवती अध्यक्ष तथा सिनेट सदस्य यासुद्धा सदर बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी सुद्धा पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले . तसेच रविंद्र वासेकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,लिलाधर भरडकर जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा न.प.सभापती गडचिरोली, नंदू नरोटे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष ,सोनल कोवे महिला जिल्हाध्यक्ष गडचिरोली,किशोर दुधबळे आरमोरी विधानसभा अध्यक्ष,सरफराज शेख तालुकाध्यक्ष धानोरा राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी पिंकु बावणकर वडसा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सभापती ,भाग्यश्री पझुला माजी जि.प. अध्यक्ष ,फहीमभाई काझी, कपिल बागडे, संजय रामणो, अभय ईंदुरकर, ममता हिचामी, आशाताई मंगाम, शैलाताई मडावी, निराशा ईंदुरकर, केशरशहा महाराज सुरसुंडी, शिवा वट्टी, दिलीप नागपुरे आणि मंगेश नरचुलवार यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीमुळे धानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या काळात पक्ष अधिक आक्रमकपणे कार्य करेल असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

