
सोनू वाळके,जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली.
विद्युत स्मार्ट मिटर लावण्या बाबत
आम आदमी पार्टीचा विरोद्ध
अधिक्षक अभियंता म. रा. वि. वी. गडचिरोली आप पदाधिकारी यांनी दिले निवेदन.

गडचिरोली :– आम आदमी पार्टी पदाधिकारी यांचे स्मार्ट मिटर ला संपूर्ण विरोध व सध्याचे पोस्टपेड मिटर सुरू ठेवणे बाबत शेकडो सह्याचे मा अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी गडचिरोली यांच्याकडे निवेदन सोपवण्यात आले,
महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री यांनी अधिवेशन काळात स्मार्ट मिटर लावणार नाही अशी घोषणा केली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकाची विनंती आहे मिटर कंपनी स्वखर्चाने मोफत लावणार अशी जाहिरात केली आहे परंतु हे मिटर मोफत लावणार नाही याची जाणीव नागरिकांना आहे.
वीज कायदा 2003 अधिनियम क्र 47 ( 5 ) नुसार कोणता मिटर वापरण्याचा स्वातंत्र्य कायदेशीर हक्क ग्राहकांना आहे हक्क म्हणून पोस्टपेड मिटर कायम ठेवण्यात यावे. तथापी विद्युत ग्राहकांचे नुकसान लक्षात घेता स्मार्ट मिटर बसविण्यात येवू नये अन्यथा जोडणीला प्रखर विरोध करण्यात येईल.
निवेदन सुपूर्द करताना
आपचे जेष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे ,
संतोष कोटकर ,
जाणिकरावजी ननावरे , केशवजी सातपुते
नामदेवजी पोले,हरिदास सेलोटे, प्रभाकर मुत्यालवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

