MLA Ashish Deshmukh break the traffic rules

न्यूज जागर
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी बिना हेल्मेट ने वाहन चालवून वाहतुकीचे नियम भंग केल्याची घटना सावनेरमध्ये ‘हर घर तिरंगा’ बाईक रॅली दरम्यान घडलेली आहे. MLA Ashish Deshmukh break the traffic rules
स्वातंत्र्यदिन उत्सवाच्या पार्शवभूमीवर घर घर तिरंगा बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, सदर रॅलीत आमदार देशमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांचा जमाव दिसून आला, सर्वांच्या चेहऱ्यावर रॅलीची उत्सुकता दिसून आली पण त्या सर्वानी बिना हेल्मेट वाहन चालविले असून रॅलीच्या गस्तीवर असणारे पोलिस आणि अधिकाऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. आणि कायदा हा फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहे याची प्रचिती पुन्हा एकदा झाली.

आमदार देशमुख हे उच्च विभूषित असून त्यांच्याकडून अश्या चुका झाल्यास सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय शिकावे अशी चर्चा सध्या सावनेर शहरात होत आहे.

