ration

रुपेश वलके, गडचिरोली प्रतिनिधी
अनेक वर्षापासून शासन Jr असताना सुद्धा पोर्टेबिलिटी अंमलबजावण्याची कारवाई नाही शासन पोर्टेबिलिटी अंतर्गत चे गडचिरोली शहरात व जिल्हयात धान्य उपलब्ध करून देण्यात यावे असे आदेश असताना सुद्धा पोर्टेबिलिटी चे धान्य कुठल्याही रास्तभाव दुकानात मिळत नाही. गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार असल्याने जिल्ह्यातील पुरवठा विभाग शासनाकडे मागणी करायला पाहिजे.
नक्सल समर्पित नागरिकांना गडचिरोली जिल्ह्यात अंतोदय योजनेचा लाभ दिला जातो त्याच धर्तीवर आणि त्याच जीआर नुसार गोरगरीब, विधवा महिला,अपंग, कॅन्सर बाधीत रुग्ण, दुर्धर आजार असलेले सिकलसेल बाधित रुग्ण, तलाक बाधित गोर गरीब महिला चे सुद्धा अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.

गडचिरोली तहसील कार्यालय पुरवठा विभागात कायमस्वरूपी कार्ड लिपिक आणि परमिट लिपीक ची पदे तातडीने भरण्यात यावी जेणे करुन नागरिकांना त्याचा ञास होणार नाही बरेच वर्षा पासून जोडण्यात आलेले रास्त भाव दुकानाचे परवाने रद्द करून ते परवाने महिला बचत गटाना देण्यात यावे ऑनलाइन रेशन कार्डवर वरून गोरगरीब जनतेला वेटीस धरू नये जुन्या पद्धतीने रेशन कार्ड मिळण्यात यावे ऑनलाइन रेशन कार्ड ची कामे पुरवठा विभाग तहसील कार्यालयाच्या मार्फतीनेच करण्यात यावे, प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे v सर्व बाबीवर तोडगा काढण्यात यावा अशी लोकांची मागणी आहे.

