
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची दि. 6/12/2025
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर चालणाऱ्या कोरची येथील बौद्ध समाजाने 6 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन अतिशय श्रद्धेने व एकतेच्या भावनेने कार्यक्रम संपन्न.
कार्यक्रमाच्या नागपूर येथील आयकर विभागाच्या साखरे मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध महासभेचे अध्यक्ष रामदास साखरे, बौद्ध महासभेचे सचिव श्रावण अंबादे,निवृत्त मुख्याध्यापक शालिकराम कराडे, निवृत्त मुख्याध्यापक देवराव गजभिये,नगराध्यक्षा हर्षलता भैसारे, जिप शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा आवारी, उपस्थित होते.
कोरची येथे बौद्ध समाजाचे चार धम्म ध्वज आहेत. हे चारही धम्म ध्वज गावातील सर्व घटक एकत्र येऊन फडकवताना. ही परंपरा यंदाही कायम ठेवली गेली.
प्रथम बुद्ध भूमीवरील धम्म ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर लुंबिनी विहारातील, नंतर धमभुमीवरील व शेवटी बाजार चौकातील धम्म ध्वज फडकवण्यात आला.
बाजार चौकातील मुख्य कार्यक्रमात शालिकराम कराडे आणि देवराव गजभिये यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन भैसारे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर अंबादे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन कराडे, विनोद वालदे, चंद्रशेखर वालदे, विशाल जांभुळे, कमलेश भाणारकर आणि इतर युवकांनी अथक परिश्रम घेतले

