The vile, cruel father’s double hanging sentence converted to life imprisonment

नागपूर : ६ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वतःच्या सोळा वर्षीय मुलीला फासावर लटकवत तिच्या आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या नराधम, निष्ठुर बापाची दुहेरी फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेपेमध्ये रूपांतरित केली आहे.
गुड्डू छोटेलाल रजक (वय ४०, रा. देवीनगर, वांजरा) असे आरोपी बापाचे नाव आहे. गुड्डूच्या पहिल्या पत्नीने २०१६ मध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. तिच्यापासून दोन मुली व एक मुलगा आहे. गुड्डूने २०१८ मध्ये दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. गुड्डूचा दुसऱ्या पत्नीच्या संपत्तीवर डोळा होता. हे लक्षात येताच ती गुड्डूला सोडून वेगळी राहू लागली. याच काळात गुड्डूने आपल्या मोठ्या मुलीवर अत्याचार करणे सुरू केले. newsjagar
हा प्रकार असाह्य झाल्याने तिने शाळेतील महिलेला याबाबत सांगेल, असा इशारा दिला. भीतीपोटी गुड्डूने मुलीसह संपत्तीच्या हव्यासापोटी पत्नी व मेव्हण्याचा देखील काटा काढण्याचे ठरविले. मुलीला फासावर लटकवले. तिने प्राण सोडल्याची खात्री झाल्यानंतर गुड्डूने घटनेपूर्वी पत्नी व मेव्हण्याविरोधात मुलीकडून लिहून घेतलेली सुसाईड नोट जमिनीवर टाकली. सकाळी मुलीने गळफास घेतल्याचा बोभाटा केला होता. सत्र न्यायालयाने गुड्डूला अत्याचार आणि खुनाच्या आरोपात दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली होती.

The Mumbai High Court Nagpur Bench commuted the double death sentence of a heinous, cruel father to life imprisonment.
आरोपी गुड्डूच्या पहिल्या पत्नीने २०१६ मध्ये विष पिऊन आत्महत्या केली होती. तिच्यापासून दोन मुली व एक मुलगा आहे. गुड्डूने २०१८ मध्ये दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. गुड्डूचा दुसऱ्या पत्नीच्या संपत्तीवर डोळा होता. हे लक्षात येताच ती गुड्डूला सोडून वेगळी राहू लागली. याच काळात गुड्डूने आपल्या मोठ्या मुलीवर अत्याचार करणे सुरू केले, असा त्याच्यावर आरोप होता.
घटनेच्या एक महिन्यापूर्वी देखील गुड्डूने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. त्यावेळी त्याने तिला औषध म्हणून विष पाजले होते. परंतु, तिचा मृत्यू न झाल्याने मेडीकलमध्ये भरती केले. कट फसल्याने मुलीला सावत्र आई व मामाविरोधात विष पाजल्याची तक्रार देण्यास भाग पाडले. तिने मावशीला याबाबत माहिती दिली.
गुड्डुने सावत्र आई व मामाला फसविण्याचा बहाणाकरीत ‘तुझ्या गळफासाचे फोटो त्यांना मोबाइलवर पाठवायचे आहे’ असे म्हणत तिच्या मनाची तयारी केली. घटनेच्या मध्यरात्री आरोपीने मृत मुलीसह तिच्या लहान बहिणीला झोपेतून उठविले. ठरल्या प्रमाणे सर्व बनाव रचला. छोट्या मुलीला फोटो काढायला लावले. परंतु, पायाखाली ठेवलेली खुर्ची ओढल्यानंतर मुलीचे पाय जमिनीला टेकले. गुड्डने पुन्हा दोर कसला अन् स्वतःच्या पोटच्या मुलीला फासावर लटकवले.
खून आणि अत्याचार प्रकरणात गुड्डूला सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी निर्णय दिला, त्याला गुड्डूने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने अत्याचाराचा गुन्हा आणि ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द केली. तर, खुनाच्या गुन्ह्यात ठोठावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित केली. तसेच, इतर कलमातील शिक्षा कायम ठेवत एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

