korchi news

श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी , गडचिरोली
ठिकठिकाणी पडलेले खडृॆ, माहाका ते कोटरा पुलाला पडला खंडु! पुलाच्या सलाखी निघालेल्या आहेत , नागरिकांच्या जवितास धोका
कोरची तालुक्यापासुन 9 कि.मी अतरावर कोटरा, माहाका, हितापाडी मिसपीरी ते मकेंकसा तिन कि.मी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.तसेच सोहले ते बोटेकसा अनेक वर्षापासुन रस्त्याची डागडुगी करण्यात आली नसल्याने रस्ता खडेमय झाला असुन अपघाताला आमंत्रण देत आहेत.रस्त्यावर ठिकठिकाणी पडले खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले असुन रहदारी करणाऱ्यांना जीव मुठीत ठेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.परिणामी सदर मार्ग रहदारी करण्यासाठी धोकादायक ठरत आहे.असे असुनही सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हापरिषद बांधकाम विभाग व आमदार,खासदार या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत
तालुक्यातील मकेंकसा ते कोटरा,माहाका, मिसपिरी रस्ता जीर्ण झाला असुन तसेच सोहले ते बोटेकसा दुरवस्थेला आला आहे.

पुलाला भगदाड; दखल घेणार कोण?
मकेंकसा ते कोटरा ते माहाका ,तसेच सोहले ते बोटेकसा मुख्यमार्गावर प्रवाशांच्या सोयीकरिता नाल्यावर पुल आहे.पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या होत असते.असले तरी मार्गावरिल गांवाना जोडण्यासाठी हे पुल महत्वाची आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना वाहतूक पूर्णपणे ठप्प होते असे असताना या पुलाचा भाग दाट पडली आहे परंतु अपघातात प्रतीक्षेत असलेल्या विभाग याकडे डोळे झाकत आहे यामुळे पावसाळ्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास विभागाचे अधिकारी जबाबदार घेणार का ?
प्रतिकिया
कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत माहाका ते कोटरा,हितापाडी ते मिसपीरी पुल, रस्ता मंजुर करून डाबरीकरण करण्यात यावी – माजी उपसरपंच तथा सदस्य तुलाराम मडावी ग्रा.पं.कोटरा यांनी केली.आहे.
तात्काळ खराब झाले पुल,रस्ते तात्काळ मंजुर करून खंडीकर करून डाबरीकर करण्यात यावे – अमरसिंग कल्लो ग्रा.पं.सदस्य कोटरा.

