
By Nandkishore Wairagade Korchi
कोरची
महाराष्ट्रीयन कलार समाज हे कौटुंबिक प्रकरण न्यायालयात दाद मागतात पण छत्तीसगढी कलर हे सामाजिक न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवून कौटुंबिक वाद निस्तारतात सामाजिक न्यायव्यवस्थेवरती महाराष्ट्र कलाराणी विश्वास ठेवल्यास छत्तीसगड कलार समाज मराठी कलारांसोबत बेटीरोटी व्यवहार करायला काही हरकत नाही असे प्रतिपादन संतोष सिन्हा छुरिया मंडलेश्वर क्षेत्र छत्तीसगड यांनी केले.
ते कोचिनारा येथील 5 नोव्हेंबर रोजी डळसेना सिन्हा कलार समाज संघटना वतीने आयोजित भगवान शसस्त्रबाहु अर्जुन महाराज जयंती उत्सव सोहळा निमित्त उद्घाटक स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून सर्व वर्गीय कलार समाज संघटना कोरचीचे सल्लागार नंदकिशोर वैरागडे, रामकुमार नाईक,सह उद्घाटक प्रा चक्रधर मांडवे,रवी सहारे मुख्याध्यापक टिपागड विद्यालय कोडगुल , गणेश शेंडे,आसाराम शेडे माजी प.स सदस्य . डॉ नरेश देशमुख,राहुल मांडले, भुलेश्वर शेंडे जिवन मेश्राम भटगाव,दयालु सिन्हा,
दिपप्रज्वलन यशवंत दरवडे मुख्याध्यापक कोटरा तुळशिराम ठलाल, चतुर सिन्हा, विनायक शेंडे, परसराम शेडे, पुरुषोत्तम दखने,खोलबाहरा सिन्हा ईश्वर बनसोड माजुखडका,आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी भगवान शसस्त्रबाहु अर्जुन यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातुन मिरवणूक काढण्यात आली
सदर जयंती निमित्ताने तालुक्यातील सर्व वर्गीय कलार समाज बांधव एकत्रित आले होते.
बांधवांना सहस्त्रबाहू अर्जुन महाराज यांच्या जीवनपटा संदर्भात व समाज जागृती बाबत नंदकिशोर वैरागडे,प्रा चक्रधर मांडवे रवी सहारे तुळशिराम ठलाल यशवंत दरवडे जिवन मेश्राम, रामकुमार नाईक यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर डडसेना, कार्यक्रमाचे संचालन प्रदिप सिन्हा यांनी केले. यावेळी कोचिनारा डडसेना कलार समाज बांधवांच्या वतीने खास लोकाग्रहास्तव छत्तीसगडी नाचाचे व सह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्ववर्गीय कलर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते

