
सावली वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांची कारवाई;चारही आरोपी गडचिरोली जिल्हातील.
न्युज जागर/प्रतिनिधी
सावली (चंद्रपूर) सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिर्सीमधील उमरी तलावात वन्यजीव सप्ताहानिमित्त स्थानिक वनकर्मचारी पक्षी निरीक्षण करीत असताना रेशाळ कंठाच्या भिंगरी या पक्ष्याची शिकार करताना गडचिरोली जिल्ह्यातील चार आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाई सावली वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी केली.
७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्र नियतक्षेत्र सिर्सीमधील उमरी येथील तलावात वन्यजीव सप्ताह साजरा करीत असताना गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकारी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२

अनुसूची-दोन, भाग २ मधील अनुक्रमांक १००१ वर समाविष्ट असलेली रेशाळ कंठाची भिंगरी या पक्ष्याची शिकार करीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून लोमेश धोंडू गेडाम (३४), प्रताप बालाजी जराते (४५), अरविंद धोंडू गेडाम (३३) व
मुखरू सखाराम मेश्राम (६५) (रा. पारडी, ता. जि. गडचिरोली) यांना शिकार करताना ताब्यात घेतले. आरोपींकडून ६ जाळ्या, ५ थैल्या, ९ नायलॉन दोऱ्या, ९ बंडल, १६ बांबू काठ्या, ८ लाकडी खुंटी, २२५ मृतावस्थेतील पक्षी, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४९, ५०, ५१ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे, वनक्षेत्र साहाय्यक अनंत राखुंडे, वनरक्षक महादेव मुंडे, भोलेश्वर सोनेकर, एकनाथ खुडे, आर. एस. डांगे यांनी केली. तपास विभागीय वन अधिकारी राजन तलमले व साहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी विनोद

