
माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
गडचिरोली – भाजप विचारधारेच्या लोकांनी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला. आताही आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ हाच भाजपचा विचार असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केली.
अनेक वर्षे गडचिरोलीचे नगराध्यक्ष राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते सुरेश पोरेड्डीवार, माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, माजी सभापती विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, एड.लालसू नोगोटी, उबाठा चे गजानन नैताम, अजित पवार गटाच्या धानोरा तालुक्याच्या माजी सभापती रामेश्वरी नरोटे, ऍड. उमेश मडावी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते आ.विजय वडेट्टीवार, आ.रामदास मसराम, आ.अभिजित वंजारी, काँग्रेसचे निरीक्षक संदेश सिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, पंकज गुड्डेवार, माजी zp अध्यक्ष अजय कणकडालवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी नगराध्यक्ष ऍड. राम मेश्राम, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, काँग्रेसने गोरगरिबांना अन्न, निवारा आणि सुरक्षा दिली. राज्यघटनेत पाचव्या अनुसूचीद्वारे आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण केले. परंतु, आता या जमिनी खाण व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट भाजपने घातला आहे. सत्तेच्या काळात भाजपने बक्कळ पैसा जमवला. त्याचा वापर करुन ते सर्वकाही करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांना श्रीमंतांविषयी आपुलकी आहे. मात्र, गरिबांविषयी कळवळा नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली.
यावेळी माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, संध्या उईके, कविता बोबाटे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा खेवले, रामचंद्र वाढई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी आ.विजय वडेट्टीवार गडचिरोलीत आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आणि पक्षप्रवेश सोहळ्यात मोठी राजकीय घोषणा करण्यात आली. काँग्रेसने आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या रूपाने कविता सुरेश पोरेड्डीवार यांची अधिकृत घोषणा केली.

या घोषणेनंतर गडचिरोलीच्या नगरपरिषदेच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, विजय गोरडवार आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. पक्षप्रवेश कार्यक्रमातच सुरेश पोरेड्डीवार यांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार यांच्या नावाची घोषणा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून करण्यात आली. आपल्या भाषणात आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “गडचिरोली शहराच्या विकासासाठी प्रामाणिक व स्वच्छ चेहरा देण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. candidate-for-mayor-in-gadchiroli कविता पोरेड्डीवार या त्या भूमिकेस साजेशा उमेदवार आहेत.” ते पुढे म्हणाले, “पोरेड्डीवार कुटुंब हे काँग्रेस विचारसरणीशी नाळ जोडलेले आहे. घर दोन असले तरी विचार एकच आहे. आता हे घर पुन्हा एकत्र आले असून काँग्रेसची ताकद दुप्पट झाली आहे.”
वडेट्टीवारांनी यावेळी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढविला. ते म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यातील एक राजा सर्वकाही मीच जिंकणार या तोऱ्यात वावरतो. पण या राजाला लगाम घालण्याची ताकद काँग्रेसकडे आहे. लोक आता भाजपमधील दलालीला, हप्तेखोरीला वैतागले आहेत. महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी भाजप सरकारच जबाबदार आहे. candidate-for-mayor-in-gadchiroli येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजपला निश्चितच धडा शिकवेल.” या मेळाव्यात काँग्रेसने आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले. मंचावरून काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने घोषणा केली की, “या वेळी गडचिरोली नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल.” संपूर्ण मैदानात उत्साहाचा माहोल होता. या मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, गडचिरोलीत आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी आ.रामदास मसराम, आ.अभिजित वंजारी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सुरेश पोरेड्डीवार, विजय गोरडवार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले.

