
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी
तब्बल २३ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
कोरची ट्रकमधून जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळताच कोरची व बेतकाठी पोलिसांनी सापळा रचून २६ जनावरांची सुटका केल्याची घटना आज रविवार २६ ऑक्टोबर रोजी बेतकाठी बोरी दरम्यान घडली. याप्रकरणी तब्बल २३ लाख ७८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जनावरांची तस्करी करणारे वाहन बेतकाठी ते बोरी परीसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. जनावरे असलेला ट्रक हा बोरीच्या दिशेने गेल्याच्या माहीतीवरून वरीष्ठांचे परवानगीने बेडगांव पोलीस मदत केंद्र तसेच कोरची पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत २६ नग गोवंशीय जनावर असलेला ट्रक MH40 CT-7892 ताब्यात घेतला. तसेच पायलंटींग करणाऱ्या मालकसह त्याचे MH 31 GA-0313 क्रमांकाचे वाहन देखील ताब्यात घेतले, आरोपीकडून एकुण २३ लाख ७८ हजार रूपयांचा माल ताब्यात घेतला. korchi
याप्रकरणी अरबाज कुरेशी मोहम्मद झईद गो. जावेद शेख भोलु असे पायलेंटींग करणारे तसेच ट्रकचालक अजय चौधरी ट्रकचा क्लीनर संजय पानसे सर्व रानागपुर यांना ताब्यात घेण्यात आले.
सर्व गोवशाला ज्ञान फाउंडेशन गौशाळा गराडा लाखणी येथे पाठविण्यात आले. कोरची पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र प्राणिसंरक्षण कायदा १९७६ सुधारणा अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. newsjagar
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक गोकुलराज, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलीस ठाण्यातील तसेच बेडगाव पोलीस मदत केंद्रातील पोलिसांनी कार्यवाही केली. पुढील तपास बेडगांव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश खोटेले करीत

