सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून १० जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. news jagar
आज दि.२९/११/२०२४ दुपारी साडेबारा ते १ वाजेच्या दरम्यान शिवशाही बस क्रमांक एमएच ९ ईएम १२७३ बस नागपुरहून गोंदियाकडे असतांना दुचाकी अचानक समोर आली. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बसमधून ७ ते ८ जणांचे मृतदेह बाहेर
काढण्यात आले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.newsjagar
दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.