
धानोरा तालुक्यात आमदार रामदास मसराम यांची दौरा मोहिम; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या
धानोरा तालुका : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी धानोरा तालुक्यातील मेंढा, मुस्का, तळेगाव, खांबाळा, सरसुंडी, कावडीकसा व मुंजालगोंदी या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
या दौऱ्यात आमदारांनी प्रत्येक गावात जाऊन स्थानिक नागरिकांकडून विकासकामे, रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण, आरोग्य आदी विषयांवरील समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी विविध तक्रारी आणि मागण्या आमदारांसमोर मांडल्या.

आमदार मसराम यांनी सर्व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले आणि संबंधित विभागांमार्फत त्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले. *“जनतेच्या अडचणी सोडवणे आणि गावागावात विकास पोहोचवणे हेच माझे कर्तव्य आहे,”* असे आमदार मसराम यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी आमदार रामदास मसराम यांच्या दौऱ्याचे स्वागत करत त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले. संपूर्ण तालुक्यात या भेटीमुळे सकारात्मक आणि आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
त्या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, धनपाल मिसार , सरपंच खांबडा नंदकिशोर शेडमाके, सरपंच रंजना परसा, ग्रा. प. सदस्य एकनाथ काटेंगे, तालुका उपाध्यक्ष धानोरा शेरू पठाण, मारुती कोल्हे, सखाराम नैताम, शालिक परसा, पो.पा शुभांगी मडकाम, लक्ष्मण डोकरमारे, दीपक शेंडे, आनंदराव कुंभरे, जीवन उसेंडी, भास्कर मेश्राम,बळीराम कोकोडे, भाऊराव सडमाके,दीपक कुमरे, बालाजी वाढई, अशोक सडमाके, बाळकृष्ण बोगा, उपस्थित होते..

