
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची. दि. 1/10/25
जिल्हा स्टेडियम गडचिरोली येथे 01 आक्टोंबर ला खेळल्या गेलेल्या जिल्हा स्तरावरील कराटे स्पर्धेत युवास्पंदन विद्यालय भिमपूर या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविले आहे.
17 वर्षे वयोगटात या शाळेतील विद्यार्थिनी कु. हंसिका मुकुंदा सहारे 31 वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविले आहे तर त्याच गटातील सागर काशीनाथ सहारे या विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक पटकाविले आहे.
यशाचे श्रेय मार्गदर्शक पंकज नैताम,तोषण दहीवले, संस्थापक शालीकराम कराडे, मुख्याध्यापिका सुषमा टेंभुरकर, शारीरिक शिक्षक दिनेश औरासे यांना दिले.यशाबद्दल सहायक शिक्षक निलकमल बिंझलेकर, शितल वालदे, नितेश कराडे, सचिन टेंभुरकर, संजोत टेंभुर्णे, नरेंद्र वालदे या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

