
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
प्रेसनोट
दि ०१/१०/२०२५ रोजी मौजा कोरची येथे दुपारी ०१/२० वा. दरम्यान मौजा कोरची येथे आरोपी नामे बंडु सहारे वय ५५ वर्ष रा. हेटाळकसा ता. कोरची जि. गडचिरोली याने एका अल्पवयीन मतीमंद मूलीला फुस लावुन बांधकाम सुरु असलेल्या घरात घेवुन जात असतांना एका टपरी चालक महिला यांनी बघितले व सदर बाब फिर्यादी यांना सांगितली . यादरम्यान रस्त्याने येत असलेल्या दोन परिचित असलेल्या आशा वर्कर यांना याबाबत फिर्यादी यांनी माहिती दिली .त्यानंतर फिर्यादी व दोन आशा वर्कर या सदर बांध काम सुरु असलेल्या घरात गेल्या तेव्हा आरोपी हा पिडीते सोबत अतिप्रसंग करतांना आडळुन आला. हे बघताच फिर्यादी यांनी पिडीतेला आरोपीच्या ताब्यातुन सोडवले. आरोपी हा आपल्या सायकल वर पळुन जात असतांना फिर्यादी यांनी आरडा ओरड केल्याने आजुबाजुला असलेल्या लोकांनी आरोपीला पकडले. आरोपी नामे बंडु सहारे वय ५५ वर्ष रा. हेटाळकसा ता. कोरची जि. गडचिरोली याने एका अल्पवयीन मतीमंद मूलीला फुस लावुन तिच्या मानसिकतेचा फायदा घेवुन शारिरीक संबंध प्रस्तापित केले अशा फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन कोरची येथे अपराध क्र. ११७/२०२५ कलम 64 (2) (i), (k), 65 भा. न्याय सहिता सह कलम 4 (2),6 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक, श्री निलोत्पल सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री एम. रमेश सा., मा.श्री गोकुळ राज सा, मा. श्री उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रविंद्र भोसले सा. यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक, मुकुंद देशमुख, पोलीस स्टेशन कोरची हे करीत आहे


