
बुलढाणा :- कापसावरील आयात शुल्क घटवल्यामुळे कापसाचे भाव हे घसरणार आहे. कापसाला अपे क्षीत भाव मिळण्याची शेतकर्यांना अपेक्षा होती. पण त्यावर सरकारने कापसावरील आयात शुल्क कमी करून पाणी फेरले आहे.
आता राज्यात विशेषकरून विदर्भात मोठ्याप्रमाणात कापसाचे उत्पादन होणार आहे. त्या आधीच सरकारने कापसावरील आयात शुल्क घटविण्याचा निर्णय हा आत्मघातकी निर्णय ठरणार आहे. असे राष्ट्रवादी शपा गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे दि. १० सप्टेंबर रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. Shashikant Shinde या पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कार्याध्यक्ष नरेश शेळके, माजी आमदार रेखा खेडेकर, प्रसन्नजित पाटील, बी टी जाधव, अतुल लोखंडे, अनिल वर्मा यांच्या सह इतरांचा समावेश आहे.


