
अमरावती:- एका अल्पवयीन युवती सोबत जून महिन्यात एका २७ वर्षीय युवकाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले होते. याप्रकरणी त्याने तिला कुणाजवळही वाचता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती.
या कारणास्तव युवतीने या प्रकरणाची कुणाजवळही वाचता केली नव्हती. मात्र, शाळेत मुलींच्या वैद्यकिय तपासणी दरम्यान ती गर्भवती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वरुड पोलिसांनी या संदर्भात आरोपी राहुल युवनाते (वय २७, रा.तिवसाघाट) याच्येविरुद्ध पोस्कोंतर्गत बलात्कारासह विविध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. अल्पवयीन युवती व आरोपी यांची पूर्वीपासूनच ओळख होती. ती जेथे राहते तिथेच ती शिक्षण घेत आहे. सदरील घटना घडली तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या होत्या. ती सुट्टींमध्ये आईकडे वरुड येथे आली होती. याच दरम्यान २५ जून रोजी ती तिच्या आजोबांना जेवनाचा डबा देवून घरी परतत असताना राहुल तिला वाटेत भेटला.

तिला म्हणाला की, तु मला आवडते, तिचा हात पकडुन त्याने तिला चुडामन नदीचे बाजुला असलेल्या पडीत जागेतील झुडूपात नेले. बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी कुणाला काही सांगितले तर जीवे मारेल अशी धमकी दिली. तेव्हापासून तिने कुणाजवळही वाच्यता केली नाही. मात्र, ९ सप्टेंबर रोजी शाळेतील मुलींच्या वैद्यकीय तपासणीनंतर ती गर्भवती असल्याची माहिती समोर आली. तेव्हा या घटनेची माहीती तिच्या पालकांना देण्यात आली. याप्रकरणी वरूड पोलिसांत तक्रार दाखल झाली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनात वरूड पोलिस करीत आहे.

