
भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश
गडचिरोली – गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभाग स्थापित करण्यासाठी रेट्रोफिटिंग च्या कामाकरीता आवश्यक असलेला 28 कोटी पैकी 25 कोटी रुपयांचा नीधी मंजूर झाला आहे. यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारने याची प्राथमिकता लक्षात घेत हा निधी मंजूर केला.
गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यापासुन तर त्यासाठी आवश्यक जागेपासून ईतर आवश्यक बाबींसाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी विशेष प्रयत्न केले व आवश्यक तो पाठपुरावा केला. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर निधि काही तांत्रिक कारणामुळे रखडला होता ही बाब लक्षात घेवून डॉ. होळी यांनी 25 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेवून निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली व राज्य सरकारने तात्काळ 471.41 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.आणि आता एम. बी. बी. एस च्या प्रथन व द्वितीय वर्गासाठी विविध विभाग स्थापित करण्यासाठी रेट्रोफिटिंग च्या कामाकरीता 28 कोटी पैकी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपूर्ण कामास गती मिळणार आहे.

आपल्या पाठपुराव्याची दखल घेत निधी मंजूर केल्याबद्दल भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, यांचे आभार मानले आहे.

