
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मौजा सायगाव येथे नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत १० लाख रुपयांच्या सभामंडपाच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार रामदास मसराम यांच्या शुभहस्ते दि. १७ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, गडचिरोली अंतर्गत आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२६-२७ मधून गजानन मेश्राम यांच्या घराजवळ या सभामंडपाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे सायगावमधील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची आणि सोयीची जागा उपलब्ध होणार आहे.

गावातील मूलभूत गरजा आणि नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून सायगावमध्ये हे महत्त्वाचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे गावाच्या विकासात आणखी एक भरीव पाऊल पडले असून, सभामंडपामुळे ग्रामस्थांच्या सार्वजनिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, माजी सरपंच शिल्पा कोल्हे, हेमराज प्रधान, गणपत कोपुलवार, विठ्ठल नारदेलवार, टिकाराम प्रधान, राजेंद्र वाघाडे, रवींद्र भालाम, सुरज प्रधान, धनराज डुंबरे, विष्णू दुमाने, घनशाम मेश्राम, दिवाकर कोल्हे, महादेव भालाम, अनिल मेश्राम, सुखदेव कोल्हे, मोहन वाघाडे, झिंगर मेश्राम, विनोद कोल्हे, मारोती मेश्राम, शामराव मेश्राम, चरण राऊत, भावराव दुमाने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
जनतेच्या गरजा ओळखून विकासकामांना प्राधान्य!
गावागावात विकासाची कामे पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा; सायगावच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर!
सभामंडपाच्या भूमिपूजनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, गावाच्या सार्वजनिक सुविधांमध्ये भर पडणार असल्याने नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत केले.

